चुकीच्या मोजणीचा शेतकऱ्यास फटका चुकीच्या मोजणीचा शेतकऱ्यास फटका
पिरंगुट, ता. ५ : लवळे (ता.मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांना चुकीच्या मोजणीचा फटका बसला आहे. याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी त्यांनी पौड येथील भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी भूमिअभिलेख, तहसील तसेच पौड पोलिस ठाणे आदी कार्यालयांना निवेदन दिले आहे.
राऊत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राऊत यांच्या लवळे येथील शेत जमिनीची मोजणी काही वर्षांपूर्वी झाली होती. यावेळी भूमिअभिलेख कार्यालयाने शेतीच्या गटाच्या हद्दीवर शेतकऱ्याचे घर दाखवण्यात आलेले आहे. परंतु हे घर त्याठिकाणी नसून त्यापासून काही अंतरावर आहे. मोजणी वेळी मोजणी अधिकाऱ्यांनी हद्दीच्या चुकीच्या खुणा दाखवल्या आहेत. या गटाच्या मोजणी संदर्भात मोजणी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मोजणी संदर्भात सुनावणी बाबत योग्य तो निर्णय देण्यास विलंब करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी व मला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा २२ ऑक्टोबर २०२४ रोजी आमरण उपोषणास बसणार आहे. त्यानंतरही न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, पौड येथील भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक स्वप्ना पाटील म्हणाल्या की, अरुण राऊत यांच्या शेताची २००६ मध्ये मोजणी झाल्यानंतर न्यायालयाने राऊत यांच्या विरोधात निकाल दिलेला होता. त्यानंतर अरुण राऊत यांनी हद्द कायम करण्याचा अर्ज केला होता. त्यानुसार , मोजणी होऊन कायम केलेल्या हद्दी राऊत यांना मान्य नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

