मतदारांच्या स्वागतासाठी लवळे ग्रामस्थांकडून रांगोळी
पिरंगुट, ता. १९ : लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा आणि ग्रामस्थांच्यावतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली आहे. ग्रामपंचायत लेखनिक ज्योती गायकवाड, रूपाली नलावडे, अक्षदा कऱ्हेकर आणि मंदा गोठे यांनी ही रांगोळी रेखाटली असून, या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. यावेळी पौड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप चव्हाण, सरपंच रणजित राऊत, माजी सरपंच संजय सातव, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल साकोरे, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम राऊत, पोलिस पाटील संपत राऊत, बीएलओ रवींद्र डोळसे, कैलास आल्हाट, दादा वीर, विद्यानंद कांबळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

