मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

मुलीला त्रास देणाऱ्या 
तरुणाला अटक
Published on

पिरंगुट, ता. ३ : मुळशी तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला पौड पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने अटक केली. अर्जुन दिगंबर जाधव (वय १९, रा. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर पॉस्कोअंर्तगत गुन्हा दाखल केला आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलीला जाधव हा त्रास देत होता. त्याने संबंधित मुलीचा हात धरून ‘माझे तुझ्यावर प्रेम असून तू माझ्याशी बोलली नाही तर तुला ठार मारेन’ तसेच ‘तुझ्या घरच्यांना देखील ठार मारीन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्या मुलीने ही घटना निर्भया पथकामधील महिला पोलिस हवालदार अनिता रवळेकर यांना संपर्क करून सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अनिता रवळेकर व पोलिस हवालदार सिद्धेश पाटील यांनी शाळेत जाऊन भेट घेतली व पुढील तपास करून जाधवला अटक केली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जाधव करीत आहेत. मुळशी तालुक्यात अशा प्रकारच्या घटना कुठे घडत असतील तर मुलींनी व महिलांनी पौड पोलिसांना तातडीने कळवावे. त्यासाठी निर्भया पथकातील अनिता रवळेकर यांच्याशी ९१३०५४१०२६ या मोबाईल क्रमांकावर अथवा थेट ११२ या क्रमांकावर तातडीने संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com