धोकादायक होर्डिंग्जचा मुळशीत सुळसुळाट
धोंडिबा कुंभार : सकाळ वृत्तसेवा
पिरंगुट, ता. २३ : मुळशी तालुक्यात बहुतांशी लोखंडी होर्डिंग अनधिकृतपणे उभारलेले आहेत. पाऊस तसेच वादळामध्ये विनापरवाना धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात बहुतांश सार्वजनिक जागांवर, रस्त्यांवर जाहिरातीचे होर्डिंगचे जाळे पसरले आहे. मृत्यूचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
पुणे-कोलाड महामार्गालतच्या अशा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगची संख्या जास्त आहे. रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वी उभारलेले होर्डिंग आता थेट रस्त्यात आलेले आहेत. मोठा कंटेनर या होर्डिंगला धडकला तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यात आलेले हे होर्डिंग दूर करणे अत्यावश्यक झालेले आहे. आतापर्यंत होर्डिंग कोसळून काही अपघात झालेले आहेत. त्यात अनेकांचा बळीही गेलेला आहे. मोटारी, इमारतींचे नुकसान झालेले आहे. काही होर्डिंग विजेच्या उच्च दाब वाहिनीलगत उभारलेले आहेत. यापूर्वी आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. संबंधित होर्डिंगधारकांवर गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र, असे असूनही पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती सर्वत्र आहे.
दरम्यान, बऱ्याच ग्रामपंचायतींनी अचूक आकडेवारी न देता त्यात काहीशी लपवाछपवी केलेली होती.
सर्वत्र होर्डिंगची स्पर्धा
पुणे व पिंपरी चिंचवड शहराप्रमाणेच मुळशी तालुक्यातील भूगाव, भुकूम, पिरंगुट, सूस, हिंजवडी, माण आदी शहरालगतच्या गावांतील रस्त्यालगतच्या जागा सर्वत्र होर्डिंगने व्यापल्या असून त्याचे स्वरूप भयानक आहे. या होर्डिंगची उंची, आकार व संख्येची स्पर्धाच सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
दृष्टिक्षेपात
१. होर्डिंग उभारणे पूर्णपणे बंद करावेत
२. होर्डिंगचे ठिकाण स्ट्रक्चर ऑडिट करवून घेणे गरजेचे
३. होर्डिंगवरही कारवाई करण्याचे अधिकार केवळ पीएमआरडीएलाच
४. पीएमआरडीएचे बोटचेपे धोरण, कारवाईबाबत टाळाटाळ
५. हद्दीतील कारवाईचे ग्रामपंचायतीला अधिकार
गावखाती होर्डिंग
सध्याचे अवजड, जीवघेणे आणि धोकादायक होर्डिंग हे पुणे कोलाड रस्त्यालगत उभारलेले असल्याने भूगाव, भुकूम, पिरंगुट, कासार आंबोली, अंबडवेट, पौड तसेच अन्य ग्रामपंचायतींनी या होर्डिंगवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील होर्डिंग गावखाती झाली आहेत.
दोन वर्षांपूर्वी तालुक्यात होर्डिंगची .
गाव निहाय होर्डिंगची संख्या
हिंजवडी.......११५
माण.......७२
भुकूम.......३८
कासारसाई.......७
भूगाव.......१५
उरवडे.......३
आंबडवेट.......४
चांदे.......५
नांदे.......८
मारुंजी.......२८
रिहे.......१
नेरे.......७
भोडे.......३
कोंढावळे.......२
लवळे.......३
पिरंगुट.......३३
पौड.......१५
कासार आंबोली.......५
घोटावडे.......७
मुळशी तालुका पीएमआरडीएच्या अखत्यारित येतो. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे अधिकार फक्त पीएमआरडीएच्या कार्यालयालाच आहेत. आम्हाला फक्त गावठाणातील होर्डिंगवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
- सुधीर भागवत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी
04371
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.