‘मुळा’ मे महिन्यात थडी भरून वाहू लागली

‘मुळा’ मे महिन्यात थडी भरून वाहू लागली

Published on

पिरंगुट, ता. २७ : गेल्या पंधरा दिवसांत मुळशी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असल्याने शेतीसह घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मे महिन्यात येथील मुळा नदीला पूर येण्याची घटना अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच झाली आहे. यावर्षी मुळा नदीला मोठा पूर आला असून या हंगामात प्रथमच दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे काठावरील कृषीपंपांचे नुकसान झाले आहे.
मुळशी तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुळशीत मंगळवारी (ता. २७) सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे - पौड - ६६ , पिरंगुट - ६१ , घोटावडे - ७१, थेरगाव - ७७, माले - ७५, मुठा - ७०. त्यामुळे मंगळवारच्या सकाळच्या नोंदीनुसार मुळशीत सरासरी ७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
गेल्या १३ मे पासूनचा विचार केल्यास मुळशीत आजअखेर सरासरी २७७ मिमी इतका पाऊस झाला आहे. १३ मे रोजी मुळशीतील थेरगाव येथे ९८ मिमी इतका पाऊस कोसळलेला असून त्याच दिवशी मुठा येथे ८५ मिमी इतका पाऊस पडलेला आहे. मात्र असे असूनही सोमवारी (ता. २६) तालुक्यात पडलेला पाऊस हा या महिन्यातील आजपर्यंतचा उच्चांकी नोंद झालेला पाऊस आहे. १३ मे पासून २६ मे अखेर तालुक्यातील मंडलनिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : पौड - २४१, पिरंगुट - २६४, घोटावडे - २६२, थेरगाव - ३८०, माले - २३६ तर मुठा - २८०. त्यामुळे थेरगाव या मंडलात सर्वाधिक म्हणजे ३८० मिमी इतका पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com