भोरमधील शाळांना ५६ कोटी ९२ लाखांची तरतूद

भोरमधील शाळांना ५६ कोटी ९२ लाखांची तरतूद

Published on

पिरंगुट , ता. १ : भोर विधानसभा मतदारसंघातील ६० शाळा आता पुणे मॉडेल स्कूल बनणार आहेत. याकरिता २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५६ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली. मतदारसंघातील भोर, मुळशी आणि राजगड या तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित व दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधी अंतर्गत ‘पुणे मॉडेल स्कूल’ हा विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे.
याबाबत शंकर मांडेकर यांनी सांगितले, ‘‘मतदारसंघातील ६० शाळा या विविध पायाभूत सुविधांसह आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. पुणे मॉडेल स्कूल (आदर्श शाळा) या प्रकल्पांतर्गत संबंधित शाळांची स्थळ पाहणी करून, समग्र शिक्षा अभियान आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून आवश्यक सुविधांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या, व्यासपीठ, प्रवेशद्वार, पदपथ, हँड वॉश स्टेशन, बसण्याची जागा, शौचालये आणि संरक्षक भिंतींसारख्या सुविधा उभारल्या जाणार आहेत.’’

तालुकानिहाय मंजूर निधी पुढीलप्रमाणे :-
मुळशी - २० शाळांसाठी १७ कोटी २२ लाख ९३ हजार रुपये , भोर - २४ शाळांसाठी २० कोटी ७ लाख ९५ हजार रुपये, राजगड - १६ शाळांसाठी १९ कोटी ७१ लाख २० हजार रुपये.

तालुकानिहाय शाळांची नावे पुढीलप्रमाणे -
मुळशी - राऊतवाडी, शिंदेवाडी, मुठा, लव्हार्डे, दासवे, कासारसाई, रिहे, केमसेवाडी, चांदे, करमोळी, माले, वाळेण, भांबर्डे, शेरे, मुलखेड, बेलावडे, निवे, वांद्रे, खारावडे व मारुंजी.
भोर - वडगाव डाळ, खानापूर, वरोडी खुर्द, येवली, केंजळ, भोंगवली, देगाव, धांगवडी, वर्वे खुर्द, कुरुंगवडी, शिवरे, तांभाड, वडतुंबी, चिखलगाव, निगुडघर, साळव, निवंगण, शिळिंब, भोलावडे, किवत, महुडे बुद्रूक, वाढाणे, वेळवंड व गुहिणी.
राजगड - धानेप, अंत्रोली, पासली, वांजळे, पाबे, खाटपेवाडी, चिरमोडी, अडवली, वांगणीवाडी, वांगणी, कोदवडी, वडगाव झांजे, कादवे, पानशेत, रुळे व रांजणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com