भरेमध्ये रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा
पिरंगुट, ता. १७ : घोटावडे फाटा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते हिंजवडी या रस्त्याची झालेली दुरवस्था ही प्रवाशांसाठी वर्षानुवर्षांची डोकेदुखी बनली आहे. भरे येथील वीज वितरण कंपनीच्या समोरील रस्ता डबक्याचे साम्राज्य झालेले आहे. हॅमच्या (Hybrid Annuity Model) माध्यमातून होणारा हा रस्ता सुमारे दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे हॅमची तांत्रिक अडचण आता दूर झाल्याने दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप युवा मोर्चाचे मुळशी तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते.
याबाबत सागर मारणे म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे हॅम योजनेत सदर रस्ता अडकून पडला होता. मागील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठक घेऊन माहिती घेतली असता, हा रस्ता हॅम (हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल) योजनेतून केलेला होता. पण काही कारणाने तो रस्ता पूर्ण होऊ शकत नाही असे समजले. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता हॅम योजनेतून रद्द करावा या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाला प्रस्ताव त्वरित पाठवणे गरजेचे होते. तसा प्रस्ताव तयार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या नेहमीच्या दिरंगाई करण्याच्या सवयीने तो प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलाच नाही. त्याकरिता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सदर रस्ता व हॅम प्रस्ताव संदर्भात माहिती दिली. त्यांनी तत्काळ तातडीने हॅम योजनेचा प्रस्ताव पुणे विभागातून मंत्रालयात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.