टेमघर धरणाच्या पाण्याचे लवार्डे येथे जलपूजन

टेमघर धरणाच्या पाण्याचे लवार्डे येथे जलपूजन

Published on

पिरंगुट, ता. २१ : लवार्डे (ता.मुळशी) येथील टेमघर धरण शंभर टक्के भरले. यामुळे मुठा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन केले.
मुठा नदीलगत असणारी गावे व मुठा खोरे परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदे व इतर तरकारी शेती केली जात असून, दुग्ध व्यवसायही केला जातो. शेतीसाठी, जनावरांसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने मुठा खोरे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या चार वर्षांपासून टेमघर ग्रामपंचायतचे सरपंच सचिन मरगळे यांच्या पुढाकाराने टेमघर ग्रामस्थ तसेच परिसरातील शेतकरी या ठिकाणी जलपूजन करतात.
यावेळी गणेश मांडेकर, सचिन मरगळे, तानाजी मारणे, तुषार उभे, दामोदर उभे, बाबूराव मारणे, शिवराज शिंदे, मयूर उभे, जय पासलकर, प्रकाश मरगळे, तेजस जोगावडे, दीपक मरगळे, भरत उभे, धीरज मारणे, संतोष मरगळे, सचिन कोकरे, गणेश गोरे आदी उपस्थित होते.


04724

Marathi News Esakal
www.esakal.com