मुळशीतील पाणंद रस्त्यासाठी दोन कोटी ४० लाख रुपये निधी
पिरंगुट, ता. ८ : मुळशी तालुक्यातील विविध गावच्या पाणंद रस्त्याच्या कामांसाठी दोन कोटी ४० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी दिली. चांदेरे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी पाठपुरावा केला होता. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली विकास कामे पुढीलप्रमाणे- खारावडे येथील आखाडेवस्ती व ढेबे वस्ती रस्ता, भुकूम येथील आंग्रेवाडी ते वहाळेवाडी रस्ता, माले येथील गोरे वस्ती ते हिवाळे वस्ती, भोडे येथील लिंबूनदरा रस्ता, टेमघर येथील अंतर्गत रस्ते, भादस येथील शिळेश्वर मधील पाणंद रस्ता, दारवली येथील सिंबायोसिस महाविद्यालय ते गावठाण रस्ता, नांदे येथील नांदे म्हाळुंगे रस्ता ते माण बंधारा रस्ता, चाले येथील खैरेवस्ती अंतर्गत रस्ता, करमोळी येथील साखरे वस्ती ते जांभूळकरवस्ती, डावजे येथील स्मशानभूमी परिसरातील रस्ता.