पिरंगुट येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज
पिरंगुट, ता. १० : पिरंगुट (ता.मुळशी) येथील प्राथमिक आरोग्य पथक रुग्णसेवेसाठी सातत्याने तत्पर असल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे. मात्र, येथील परिसरातील झपाट्याने झालेले नागरीकरण , औद्योगीकरण आणि वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटना आदींमुळे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य पथकाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज निर्माण झाली आहे.
मुठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येथील आरोग्य पथक कार्यरत असते. येथील प्राथमिक आरोग्य पथकात दररोज सुमारे ८० ते १०० रुग्ण ओपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतात. डॉ. ऋतुल रासकर वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतात. सध्याच्या परिस्थितीत या पथकात वैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचारी वर्ग निवासी उपलब्ध असतो. सगळे अधिकारी व कर्मचारी मुक्कामालाच असल्याने रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. या ठिकाणी उपयुक्त औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध असून श्वानदंश सहित सर्व लसी उपलब्ध आहेत. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग योग्य ते सहकार्य करतानाचे चित्र आहे. परिसरात शेकडो खासगी दवाखाने असूनही गोरगरीब व सामान्य रुग्णांबरोबरच उच्च उत्पन्न असणारे रुग्णही या पथकात उपचारासाठी येत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वामन गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) याची तयारी सुरू आहे. जेणेकरून रुग्णांना गुणवत्तापूर्वक आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्यात येतील.
दरम्यान, या पथकात अद्याप दोन शिपाई पदांची कमतरता आहे. एक पुरुष व एक महिला शिपाई आदी पदे या पथकात असणे अत्यावश्यक आहे. दिवसभरासाठी एक व रात्रपाळीसाठी एक अशा दोन शिपाईपदांची गरज आहे. याशिवाय दिवसभरासाठी एका महिला शिपाई पदाचीही अत्यंत गरज आहे. या पथकात महिला प्रसूतीसाठी मदत म्हणून महिला शिपाई असणे अत्यावश्यक आहे.
04913
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

