लवळे येथील पुलावर अपघाताचा धोका
पिरंगुट, ता. २६ : लवळे (ता. मुळशी) येथील कळमकरवस्ती येथील भरे गावाकडे जाणाऱ्या ओढ्यावरील रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून, पुलावर मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यावर आता गवत व झाडे झुडपे तयार झाल्याने पुलाचेही नुकसान होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
गवतामुळे वाहनचालकांच्या लक्षात हा खड्डा येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केलेले आहे. मात्र, येथील पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहून गेल्याने या पुलावरील रस्त्याच्या उत्तर- पश्चिम उताराकडील सुमारे पाच ते सहा फूट लांब व दोन ते तीन फूट रुंदीचा, तसेच सुमारे दोन ते तीन फूट खोलीचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. येथील पुलाच्या लवळे व भरे अशा दोन्हीही बाजूंनी उंचवटा असून, पूल सखल भागात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट पुलावर येते. या रस्त्याला या ठिकाणी गटार वाहिनी अस्तित्वात नाही. त्यामुळे पावसाचे तसेच, सांडपाणी थेट पुलावरील रस्त्यावर येते. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका वाढला आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम झाले असून, तेही काम अपुरे आहे.
याबाबत या रस्त्याचे अभियंता जयेश भदाणे म्हणाले की, ‘‘घटनास्थळी आमच्या विभागाचा प्रतिनिधी पाठवून तेथील दुरुस्ती करून घेत आहोत.’’
04965
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

