भुकूममधील कुस्ती स्पर्धेत मोहोळ, नागरे यांची बाजी

भुकूममधील कुस्ती स्पर्धेत मोहोळ, नागरे यांची बाजी

Published on

पिरंगुट, ता. २० : भुकूम (ता.मुळशी) येथील स्वयंभू रामेश्वर क्रीडानगरीत पार पडलेल्या तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीसाठी गादी विभागातून पृथ्वीराज मोहोळ तर माती विभागातून सार्थक नागरे यांनी बाजी मारली.

मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघातर्फे आयोजित स्पर्धेत १२० मल्लांनी सहभाग घेतला. गादी व माती विभागातील सर्व वजनी गटातील तसेच महाराष्ट्र केसरी गटासाठी पहिल्या दहा विजेत्यांना प्रत्येकी दुचाकी, चषक व रोख रक्कम तसेच बालगटातील पहिल्या दहा विजेत्यांना सायकल, चषक आणि रोख रक्कम देण्यात आली.
संघाचे अध्यक्ष गोविंद आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्‌घाटन भुकूम ग्रामस्थांच्या हस्ते झाले. बक्षीस समारंभास आमदार शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, सुनील चांदेरे, आबासाहेब शेळके, शांताराम इंगवले, दगडूकाका करंजावणे, राजेंद्र दबडे, रमेश पवळे, राहुल पवळे आदी उपस्थित होते.
पांडुरंग मराठे, गणेश चौधरी व भुकूम ग्रामस्थांनी संयोजन केले होते. ॲड. भरत माझिरे यांच्याकडून गादी आणि माती विभागातील दोन्हीही विजेत्यांना चांदीची गदा देण्यात आली. माऊली कोकाटे या विजेत्या मल्लाला तुषार माझिरे यांच्या वतीने पाच लाख रुपये रोख व चांदीची गदा देण्यात आली. कुमार गटातील विजेत्या मल्लास विशाल चोंधे यांच्याकडून चांदीची गदा येणार आली.

()
स्पर्धेतील मिळविलेले वजन गटनिहाय प्रथम क्रमांक विजेते (वजनगट) : बाल गट - कार्तिक गायकवाड (२५), अथर्व देवकर (२८), समर्थ गावडे (३२), राजवीर ओझरकर (३६), विपुल निंबाळकर (४०), ओम केसवड (४४), आयुष घोगरे (४८), राज शेळके (५१), रुद्र राक्षे (५५), गौरव साबळे (६०).
माती विभाग - अनिकेत खेडकर (५७), साईनाथ गावडे (६१), शिवम महाले (६५), पृथ्वीराज सुतार (७०), चैतन्य पिंगळे (७४), हितेश पवळे (७९), ओंकार भागवत (८६), निरंजन मारणे (९२), शंतनू बांदल (९७).

गादी विभाग - अथर्व गोळे (५७), व्यंकटेश देशमुख (६१), संग्राम पानसरे (६५), संग्राम शिंदे (७०), ऋग्वेद मोरे (७४), वेदांत पवार (७९), हितेश ववले (८६), मंथन काळभोर (९२), अभिजित भोईर (९७).

दरम्यान, पंच म्हणून रोहिदास आमले, चंद्रकांत मोहोळ, हनुमंत मणेरे, विक्रम पवळे, नीलेश मारणे, संजय दाभाडे, कौशल मातेरे यांनी काम पाहिले.

05148

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com