मुळशीतील विविध शाळांना
शिष्यवृत्ती मार्गदर्शक संच भेट

मुळशीतील विविध शाळांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक संच भेट

Published on

पिरंगुट, ता. १५ : भूगाव (ता. मुळशी) येथील मनोहर सणस मित्रपरिवाराच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तक संचांचे मोफत वितरण करण्यात आले. भूगाव, उरवडे, लवळे, घोटावडे, माले, आसदे आदी माध्यमिक विद्यालयांत तसेच भूगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संचांचे वितरण करण्यात आले. इयत्ता पाचवीसाठीच्या दीडशे संचांचे तसेच आठवीसाठीच्या दोनशे संचांचे वितरण करण्यात आले.
भूगाव येथील शिक्षणप्रेमी मनोहर सणस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सणस मित्र परिवाराने अनाठायी होणारा खर्च टाळून हा शैक्षणिक उपक्रम राबविला. यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य व भाजपच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सणस, मुळशी मंडलचे भाजपचे अध्यक्ष समीर मारणे, ज्येष्ठ नेते रामचंद्र देवकर, युवा मोर्चाचे माजी कार्याध्यक्ष सागर मारणे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा सातव, मुळशी मंडलचे सरचिटणीस विकास कुडले, भाजपचे धरण विभागातील युवा नेतृत्व संजय हुंडारे, विजय मातेरे, चंद्रकांत गोडांबे, गोरख देवकर, भरत मातेरे, अक्षय गरुड तसेच विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com