पशुपालकांना चार टक्के व्याजाने कर्ज

पशुपालकांना चार टक्के व्याजाने कर्ज

Published on

पिरंगुट, ता. १३ : राज्यातील ७५ लाख पशुपालकांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याने, आता बँकांकडून खेळत्या भांडवलावर केवळ चार टक्के व्याजदराने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, तसा लेखी आदेश जारी करण्यात आला आहे.
पशुसंवर्धन समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयानुसार, किसान क्रेडिट कार्ड धारक पशुपालकांना राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बँकांमार्फत घेतलेल्या अल्पमुदती कर्जावर ही सवलत मिळेल.
अटी व शर्ती
प्रकल्प धारकाने केंद्र , राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची भारत पशुधन (एनडीएलएम) पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
व्याज परतावा सवलतीसाठी कमाल पशुधन संख्यांचाही निकष पूर्ण करणाऱ्या पशूपालकांनाच हा लाभ घेता येईल
पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे आवश्यक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com