अपघात रोखण्यासाठी 
पिरंगुट घाटात उपाययोजना

अपघात रोखण्यासाठी पिरंगुट घाटात उपाययोजना

Published on

पिरंगुट, ता. १४ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील लवळे फाटा येथील पुणे-कोलाड महामार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. येथील घाट रस्त्यात म्हसोबा मंदिर ते लवळे फाटा या दरम्यान सुमारे वीस ते पंचवीस ठिकाणी रंबलर बसविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. ८ मीमी जाडीचे प्रत्येकी पंधरा पट्टे असलेले रंबलर याप्रमाणे वीसहून अधिक ठिकाणी थर्मोप्लास्टिक रंबलर बसविण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी ८ वाजता पीएमआरडीसी, वाहतूक पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील घाट रस्त्याची पाहणी करून उपाययोजनांचे नियोजन केले. त्यानुसार लगेचच रंबलर बसविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या पाहणीवेळी सागर मारणे, एमएसआरडीसीचे अभियंता विकास पिंपळकर, बावधन वाहतूक पोलिस विभागाचे वरिष्ठ निरीक्षक दीपक गोसावी, सह प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजित कांबळे, अभियंता सत्यम बुर्के, सिद्धार्थ साठे आदी उपस्थित होते.
पिंपळकर म्हणाले, ‘‘येथील अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हसोबा मंदिर ते लवळे फाटा या दरम्यानच्या घाट रस्त्यात वीस ते पंचवीस ठिकाणी आवश्यकतेनुसार थर्मोप्लास्टिक रंबलर स्ट्रीप बसविण्यात येत आहेत. आजच त्याची सुरुवात केली आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. याशिवाय संपूर्ण घाट रस्त्यात वाहन चालकांच्या सतर्कतेसाठी ठिकठिकाणी सूचना व दर्शक फलक बसविण्यात येत आहेत.
मारणे म्हणाले, ‘‘येथील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून त्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून विविध विभागाशी संपर्क करून उपाययोजना सुरू केल्या आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com