लवळे येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मंदिरात  रंगपंचमीनिमित्त भंडारा उत्साहात साजरा

लवळे येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मंदिरात रंगपंचमीनिमित्त भंडारा उत्साहात साजरा

Published on

पिरंगुट, ता. ८ : लवळे (ता. मुळशी) येथील मंदिरात रंगपंचमीनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी आईसाहेब यांचा भंडारा विविध विधींनी उत्साहात साजरा केला. सुमारे शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यानिमित्त सकाळी येथील गावठाणातील श्री रोटमलनाथ मंदिरात तसेच राऊतवाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात मूर्तींना अभिषेक केला. त्यानंतर राऊतवाडी येथील देवघरातील मुखवट्यांना अभिषेक व जोगेश्वरी आईसाहेबांची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला.
सायंकाळी मंदिरात नैवेद्यानंतर पुन्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी देवघरातील महाआरतीनंतर देवांची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. डवर पूजनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री मूर्तींची पालखी राऊतवाडी येथील मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर देव भेटीसाठी आणि रंग शिंपण्यासाठी लवळे गावठाणातील रोटमलनाथ मंदिर व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी रंगांची शिंपण करीत मिरवणुकीत सहभाग घेतला. ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर पालखीचे खांदेकरी व पाहुणे मानकरी वर्गाचा मानपानाचा कार्यक्रम पार पडला.
येथील राऊतवाडीतील प्रतिवीर समजले जाते. येथील देवस्थान हे मूळचे पुरंदर तालुक्यातील वीर येथील नाथ म्हस्कोबा देवस्थान आहे. वीर येथील वेळोवेळी होणारे सर्व विधी लवळे येथेही होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com