हरणी येथील हर्णेश्‍वरावर जलाभिषेक

हरणी येथील हर्णेश्‍वरावर जलाभिषेक

परिंचे, ता.२१: पहिल्या सोमवारचे औचित्य साधून हरणी (ता.पुरंदर) येथील डोंगरावर असलेल्या स्वयंभू हर्णेश्वराच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावातील तरुणांनी रविवारी (ता. २०) रात्री नीरा नदीत स्नान करून, नदीचे पाणी कलशात भरून आणले व पहाटे (ता. २१) एक वाजता हरणी महादेव डोंगरावर असलेल्या हर्णेश्वराच्या स्वयंभू लिंगावर जलाभिषेक घालण्यात आला.
लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे व परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू असून या देवस्थान परिसराला पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रयत्न असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळी मंदिराचे पुजारी (भगत) महादेव यादव यांनी अभिषेक व महापूजा करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिराच्या सभामंडपात दिवसभर सांप्रदायिक भजनी मंडळाचे कार्यक्रम सुरू होता.
दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून दीड कोटी रुपयांची मंदिर व परिसर सुधारण्याची कामे केली आहेत. डोंगराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम नवलेवाडी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी व श्रमदानातून केले असून, हरणी ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने या मंदिरापर्यंत दगडी पायऱ्या करण्याचे ठरविले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंग गुलाब यादव यांनी सांगितले. यावेळी अर्जुन यादव, जयसिंग रामभाऊ यादव, विकास यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

02043

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com