कोडीत शाळेचे शिष्यवृत्तीमध्ये यश

कोडीत शाळेचे शिष्यवृत्तीमध्ये यश

Published on

गराडे, ता. ५ : कोडीत बुद्रूक (ता. पुरंदर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडीत नं.१ या शाळेतील विद्यार्थी शिवम संतोष बडधे आणि मंदार उमेश बडधे यांनी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३०० पैकी अनुक्रमे २४२ व २३८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
शिवम बडधे व मंदार बडधे यांना वर्गशिक्षक संजय कुंभारकर, मुख्याध्यापक लतीफ इनामदार, उपशिक्षक शिवाजी शितोळे, संजय जाधव, रेणुका मस्के यांचे मार्गदर्शन मिळाले.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थी आणि शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बडधे, सदस्य सचिन बडधे, उमेश बडधे, दत्तात्रेय राजीवडे, गौरव भोसले, सरपंच रंजनाताई खुटवड, उपसरपंच प्रमोद बडधे आणि पालक यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.