अभ्युदय प्रकल्पामुळे शाश्वत शेती, जलसंवर्धनाला दिशा
परिंचे, ता.९ : काळदरी (ता.पुरंदर) येथे ‘अभ्युदय लोकार्पण सोहळा’ उत्साहात पार पडला. अभ्युदय प्रकल्पाने परिंचे, माहूर, धनकवडी, दवनेवाडी, काळदरी आणि बहीरवाडी या सहा ग्रामपंचायतींमध्ये विविध शाश्वत कृषी आणि जलसंवर्धन कार्यक्रम राबवले. यामुळे ग्रामीण जीवनाला वेगळी दिशा मिळाली आहे.
युनायटेड वे मुंबई आणि जॉन डिअर फायनान्शियल इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने राबविलेल्या उपक्रमामध्ये स्मार्ट शेती, मिश्र शेती, अझोला शेती, बियाणांची प्रक्रिया, आळंबी उत्पादन, मधमाशा पालन, परसबाग (स्मार्ट किचन गार्डन) आणि शेळी पालन यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, जलसंचयासाठी चेक डॅम, शेततळे, दगडी बंधारे, जाळीचे बंधारे आणि रिचार्ज शाफ्टसारख्या जलसंवर्धनाच्या उपायांची निर्मिती केली आहे. तसेच पाणी, माती संवर्धन, शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी गेल्या तीन वर्षांपासून अभ्युदय प्रकल्प राबविण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन युनायटेड वे मुंबईचे अनिल रावल आणि जॉन डिअर फायनान्शियल इंडिया प्रा. लि. यांच्या व्यवस्थापक वैशाली राठोड यांच्या उपस्थितीने केले. कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी अनिल धुर्गूड, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि सहा ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थिती होती.
यावेळी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर स्वप्नील खंडारे, कृषी तज्ञ किरण इंगळे, माधुरी शिंदे, मीना सोनवणे, सामाजिक संयोजक मुजम्मील, फील्ड ऑफिसर ललित कदम, पूजा चिव्हे, रेश्मा ढगारे, प्रतीक जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
सामाजिक योगदानाबद्दल ग्रामपंचायतींचा सन्मान
कार्यक्रमात युनायटेड वे आणि जॉन डिअर फायनान्शियल इंडिया प्रा. लि. यांना सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल ग्रामपंचायतींनी सन्मान चिन्ह, प्रमाणपत्रे प्रदान केली. युनायटेड वे मुंबईने हा कार्यक्रम संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरित केला आहे. स्थानिक समुदायाच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रक्रिया सुनिश्चित होणार असल्याचे टीम लीडर जयवंत रणपिसे यांनी सांगितले.
02583
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

