काळदरी परिसरातील पिके बहरली

काळदरी परिसरातील पिके बहरली

Published on

परिंचे, ता.८ : काळदरी (ता. पुरंदर) परिसरात सतत पडणाऱ्या पावसाने सोयाबीन, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल पिके बहरली आहेत. काही फुलोऱ्यात तर काही परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत. पावसामुळे भात पिकाचीही चांगली वाढ झाली आहे. काही ठिकाणी कडधान्य पिकांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. फुलोऱ्यात असल्याने काही डोलणाऱ्या पिकांचे मनमोहन दृश्य पाहायला मिळत आहे.

उन्हाळी पावसाबरोबर मॉन्सून चांगला बरसल्याने परिसरातील सर्व जलाशय, तलाव, विहिरी पाण्याने तुडुंब भरल्याने पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवला नाही. खरिपातील सर्व पिके जोमात असताना पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने दाणे भरण्याच्या काळात पाण्याची गरज भागल्याने पिके जोमदार आली आहेत. पीक काढणीच्या काळात पावसाने पूर्णविराम घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असे चित्र आहे.
परिंचे मंडल कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बाजरी १६७० हेक्टर, भुईमूग ६५०, सोयाबीन ६५०, मूग ४०, उडीद ३०, सूर्यफूल ४०, काळदरी, मांढर परिसरात ४०५ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. मांढर परिसरात भाताचे पीक जोमदार आले असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पापळ यांनी सांगितले आहे.

सतत पडणाऱ्या पावसाने इतर पिके चांगली दिसत असली तरी मूग, उडीद, घेवडा आदी कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाले. शेंगांना कोंब फुटले असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- मयूर मुळीक (सरकार) शेतकरी.

परिंचे कृषी मंडल कार्यक्षेत्राचा विचार केला असता यंदा परिसरातील पिके जोमदार आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांवर रोगराई कमी प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे.रब्बी हंगामातील कांदा रोपवाटिका तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
- अनिल धुरगुडे, मंडल कृषी अधिकारी, ता. पुरंदर

02757

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com