

परिंचे, ता. २६ : पांगारे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री निष्णाई मंदिरात चांदीच्या वस्तू, तसेच दानपेटीची चोरी झाली.
देवीचे पुजारी राजेंद्र गुरव हे बुधवारी (ता. २६) पहाटे साडेपाच वाजता पुजा करण्यासाठी आले असता मंदिरातील विजेचे दिवे बंद होते. ते सुरू केले असता सुरवातीला दानपेटी नसल्याचे लक्षात आले. देवीच्या मुख्य गाभाऱ्याचे कडी कोयंडा तोडल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने गावचे पोलिस पाटील तानाजी काकडे यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेमध्ये चोरट्यांनी देवीच्या पादुका, चांदीचे तीन कळस, चांदीचा मोठा चौरंग, लोखंडी दानपेटी व अंदाजे ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले. देवीचा चांदीचा देव्हारा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिस पाटील काकडे यांनी सासवड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. परिंचे येथील हवालदार विशाल जाधव, संदीप पवार यांनी घटनास्थळी प्राथमिक पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण केले. यावेळी बोटांचे ठसे, श्वानपथक, पोलिसांनी चोरीचे सर्व पुरावे गोळा केले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक कुमार कदम, पोलिस हवालदार रुपेश भगत, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय चिल्ले यांनी मंदिराची पाहणी केली.
या चोरीचा तातडीने तपास लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी केली आहे. यावेळी उपाध्यक्ष मधूकर काकडे, संदीप काकडे, माजी सरपंच मुगटराव काकडे, राजू गुरव, मोहन गोंधळी, रवींद्र काकडे, प्रकाश काकडे, दामोदर काकडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, श्री क्षेत्र वीरजवळील धसाडे मळा येथील श्री म्हस्कोबा मंदिरात वस्तूंची चोरी झालेली घटना ताजी असताना पांगारे येथील निष्णाई मंदिरात चोरीची घटना घडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.