हरणी येथील वनक्षेत्रातील वन्यजीवांना दिलासा
परिंचे, ता. ९ : मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढला असून, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचा वतीने हरणी (ता. पुरंदर) येथील वनक्षेत्रात कोरडे पडलेले कृत्रिम पाणवठे भरण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. गेली अनेक वर्षे प्रतिष्ठानच्या वतीने उन्हाळ्यात सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढत असून, हरणी परिसरातील अनेक बंधारे कोरडे पडले आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांबरोबरच परिसरातील ओढे, नाले, विहिरी आटल्या आहेत. दिवसाही वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी फिरत असताना अनेक ठिकाणी रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेने ससे, हरिण, कोल्हे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे. पिण्याचे पाणी वन क्षेत्रात उपलब्ध नसल्याने वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रतिष्ठानने टँकरद्वारे पाच हजार लिटर पाणी सोडून या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हरणी, वीर, हिवरे, आंबळे येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यामध्ये पाणी सोडले जाते. पुरंदरच्या वन क्षेत्राचा विचार केल्यास पाणवठ्याची संख्या खूप कमी असून, जास्तीत जास्त कृत्रिम पाणवठे तयार करणे गरजेचे असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश, डॉ. हर्षल चव्हाण, विक्रमसिंह जाधव, साजिद शेख, संदीप कदम आदी उपस्थित होते.
वनखात्याच्या ताब्यातील पाणवठ्यांचे सिमेंट उडून गेले असून, त्यामुळे सोडलेले पाणी जमिनीत मुरत आहे. तरी वनखात्याने या बाबतीत लक्ष घालून तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. ऐन उन्हाळ्यात प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केल्याबद्दल अनेक वन्य प्राणी मित्रांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
- हेमंत ताकवले, सचिव, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान
02992
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

