विखे पाटील यांना क्रांतिवीर सेनेचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विखे पाटील यांना क्रांतिवीर सेनेचे निवेदन
विखे पाटील यांना क्रांतिवीर सेनेचे निवेदन

विखे पाटील यांना क्रांतिवीर सेनेचे निवेदन

sakal_logo
By

पौड, ता. ४ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्य काम चालले असल्याची तक्रार छावा क्रांतिवीर सेनेने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे निवेदनाद्वारे केली आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी रोशन पवार, संजय ठाकरे, प्रतीक साखरे, रवी सातपुते यांनी विखे पाटलांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
पौडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात तुकडबंदी कायद्याच्या विरुद्ध एक, दोन गुंठे जागेच्या खरेदी विक्रीची दस्तनोंदणी होते. येथील सब रजिस्टर यांना कायद्याची माहिती असतानासुद्धा त्याला बगल देत जाणून बुजून दस्तनोंदणी केली जाते.
ग्रामपंचायत हद्दीमधील अनधिकृत बांधकामाच्या खरेदी विक्री दस्तावर निर्बंध असताना सुद्धा अशी दस्त नोंदणी झाल्याची शंका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत मुळशीचे दुय्यम निबंधक अधिकारी सुरेश जाधव यांनी सांगितले की सर्व दस्त नोंदणी ही नियमानुसारच चालू असून कोणाला काही शंका असल्यास चौकशी करावी, त्यात चूक आढळली तर कारवाई करावी.