
भोर, वेल्हे, मुळशीत पर्यटन वाढू शकते
पौड, ता. १६ : भोर, वेल्हे व मुळशीमधील गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे आणि पर्यटनास वाढण्यास चालना मिळावी, असा मुद्दा अधिवेशनात मांडला आहे. रायरेश्वर, तोरणा, राजगड हे अतिशय महत्त्वाचे गडकोट भोर मतदार संघात आहेत. त्यामुळे या भागात पर्यटन वाढू शकते, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
अंबडवेट येथे (ता.मुळशी) नुकतेच शिवस्मरकाचे अनावरण करताना थोपटे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, कार्याध्यक्ष सुरेश पारखी, तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर, लक्ष्मण ठोंबरे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, अविनाश बलकवडे, सुनील वाडकर, राजेंद्र मारणे, विलास अमराळे, प्रसाद खानेकर, सरपंच सोनाली शिंदे, उपसरपंच सुरेश पवार, सदस्य किरण अमराळे, प्रीतम ढमाले, सुरेश पवार, दीपाली पडळघरे आदी उपस्थित होते. शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि अंबडवेट ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिवस्मारकाच्या बांधकामासाठी आणि परिसर काँक्रिटीकरणासाठी थोपटे यांनी १० लाख रुपये निधी दिला. तर पांडवकालीन महादेव मंदिराच्या सभागृहासाठी १० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अजून १० लाख रुपये देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अंबडवेट ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार केला. शिवस्मारकामधील छत्रपती शिवरायांची मूर्ती कै.संतोष बबनराव वरखडे, कै.गौरी वरखडे व कै.ज्ञानेश्वरी वरखडे यांच्या स्मरणार्थ मनीषा संतोष वरखडे यांच्यातर्फे देण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सुभाष अमराळे, पंकज नागरे यांनी रंगकामासाठी निधी दिला. जगताप यांनी स्टील व सिमेंट उपलब्ध करून दिले. अंबडवेट ग्रामपंचायतीने ग्रीलसाठी निधी दिला. यावेळी या सर्वांचा ग्रामस्थांकडून विशेष सन्मान करण्यात आला.
02164