विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचे शिक्षण द्यावे

विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचे शिक्षण द्यावे

Published on

पौड, ता.११ : ''शाळेतील संस्कारावरच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची इमारत उभी राहते. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील धड्यांबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचेही शिक्षण द्यावे,'' असे आवाहन मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार शरद ढमाले यांनी केले.

माले (ता.मुळशी) येथे सेनापती बापट विद्यालयातील माजी विद्यार्थी राजेंद्र पळसकर हे शिक्षकातून मुख्याध्यापक बनले. त्यांचे स्वागत तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत भोईटे यांच्या सेवापूर्ती गौरव करण्यात आला. त्यावेळी ढमाले बोलत होते. यावेळी मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाच्या संचालकांनी स्वकमाईतून एक लाख रुपयांचा निधी संकलित केला व त्यातून शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. संस्थाचालकांनी सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या उपक्रमाचे यावेळी तालुक्यात कौतुक होत आहे.

यावेळी ढमाले पुढे म्हणाले, की विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची मनापासून इच्छा असेल, जिद्द, चिकाटी असेल तर कोणत्याही संकटाचा सहज सामना करता येतो. त्याचप्रमाणे मदतीचे हातही पुढे येतात. त्यामुळे करिअरचे ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.

संस्थेचे उपाध्यक्ष शरद शेंडे यांनीही शाळेतील मधुभाऊ राठी सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी कबूल केल्याप्रमाणे सभागृहास साउंड सिस्टिम भेट दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक रामचंद्र दातीर, उपाध्यक्ष श्रीकांत कदम, सरचिटणीस रमेश जोरी, सहसचिव सुनील पासलकर, संचालक अनिल आधवडे व उद्योजक बंडू गुजर उपस्थित होते.

02454

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.