माले येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत

माले येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत

पौड, ता. ३ : माले (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे.

या ग्रामपंचायतीतून प्रभाग क्रमांक १ मधून चेतन राजेंद्र आधवडे, ज्योती संतोष गोपालघरे, प्रभाग क्रमांक २ मधून नवनाथ भाऊ नलावडे, अल्पना सुभाष कोंढेकर, तर प्रभाग क्रमांक ३ मधून दत्तात्रेय कोंडीबा पोकळे, गेनूभाऊ कोंडीबा पवार, रंजना अशोक जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असलेली एक जागा मात्र रिक्त राहिली आहे. सरपंच आणि सदस्याच्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. त्यासाठी चौंढाई-मालजाई माले विकास पॅनल आणि श्री मल्लिकार्जुन जनसेवा पॅनेल यांच्यात लढत होत आहे.

येथील सरपंचपद सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहे. या पदासाठी चौंढाई-मालजाई माले विकास पॅनेलचे सुहास रामचंद्र शेंडे आणि श्री मल्लिकार्जुन जनसेवा पॅनेलचे नीलेश ज्ञानेश्वर जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे. तर, प्रभाग एकमध्ये चौंढाई-मालजाई पॅनेलच्या ताई प्रकाश आखाडे आणि श्री मल्लिकार्जुन पॅनेलच्या कोमल अंकुश ढेबे या दोघी निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com