राज्य कोतवाल संघटनेच्या 
आंदोलनाला मुळशीचा पाठिंबा

राज्य कोतवाल संघटनेच्या आंदोलनाला मुळशीचा पाठिंबा

Published on

पौड, ता. ३ : कोतवालांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने एक ते बावीस जुलैपर्यंत पुकारलेल्या विविध स्वरूपाच्या टप्पानिहाय आंदोलनाला मुळशी तालुक्यातील कोतवाल संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या आंदोलनात मुळशी तालुक्यातील कोतवाल सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुळशी तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष अमित भंडलकर यांनी दिली.

या आंदोलनात मुळशी तालुका कोतवाल संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ही सहभागी होणार आहेत. याबाबत त्यांनी तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन दिले. राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थश्रेणी लागू करावी. तलाठी व लिपिक पदामध्ये २५ टक्के कोटा राखीव ठेवावा. सेवानिवृत्त कोतवाल यांना पेन्शन व अनुकंप लागू करावी. कोतवाल पदाचे नाव बदलून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करावे. सेवानिवृत्त कोतवाल यांना ३०० दिवसांचे रजा रोखीकरण मिळावे. आधी मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना एक ते २२ जुलैपर्यंत विविध स्वरूपाचे टप्पा निहाय आंदोलन करणार आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित भंडलकर, उपाध्यक्ष प्रकाश दिघे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हुलावळे, सचिव गणेश पवार, सहसचिव बापू महाडीक, सुजाता हळंदे, उज्वला खडके, संतोष चांदेरे, पोपट चव्हाण, गुलाब भिंगारे, सीताराम शिंदे, वंदना कदम, सुवर्णा बामगुडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.