जमिनीचे आरोग्य सुधारल्यास मानवी जीवन सुखकर

जमिनीचे आरोग्य सुधारल्यास मानवी जीवन सुखकर

पौड, ता १० : ‘‘माती हा शेतजमिनीचा आत्मा आहे. मातीचे आरोग्य बिघडल्याने मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. जमिनीचे आरोग्य सुधारल्यास मानवी जीवन सुखकर होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी मातीपरीक्षण करणे नितांत गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे मृदा विषयतज्ञ योगेश यादव यांनी केले.

पौड (ता.मुळशी) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने घेतलेल्या माती पाणी परिक्षण कार्यशाळा आणि शेतकरी संवाद मेळाव्यात यादव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे होते.

यावेळी चांदेरे म्हणाले की, माणसाचे आरोग्य तपासताना जसे रक्त, लघवी तपासली जाते. त्या तपासणीतील अहवालावरून त्यांना औषधे देऊन त्यांचे आरोग्य सुधारले जाते. तसेच शेतीचेही आरोग्य माती व पाणी परीक्षणातून कळते. नत्र, स्फुरद, पालाश ,इतर घटक यांची माहिती परीक्षणातून मिळाली की त्यावर खतं, औषधांची मात्रा दिली जाते. त्यामुळे शेतजमीनीचे आरोग्य सुधारून उत्तम निरोगी पिक मिळेल.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ धनेश पडवळ, कृषी अधिकारी हनुमंत खाडे, माजी जिल्हा परिषद सभापती जनाबाई इप्ते, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आनंदा घोगरे, महादेव मरगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, माऊली कांबळे, भाऊ आखाडे, रमेश नांगरे, शंकरराव मारणे, संतोष साठे, रामचंद्र देवकर, माऊली माझीरे, नाना घारे, अनंता ढमाले, विभागीय अधिकारी सुरेश नांगरे, वसुली अधिकारी राजेंद्र मारणे आदि उपस्थित होते.

सुरेश नागरे यांनी सूत्रसंचालक तर माऊली माझिरे यांनी आभार मानले.

03340

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com