‘नवोदय’ प्रवेशासाठी १०,५१७ परीक्षार्थी
पौड, ता. १८ : पुढील शैक्षणिक वर्षाची इयत्ता सहावीसाठीची पीएम श्री नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवारी (ता. १८) सर्वत्र सुरळीत पार पडली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील एकूण ३३ परीक्षा केंद्रात इयत्ता पाचवीच्या १० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने पीएम श्री नवोदय विद्यालय चालविले जाते. येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची व शिक्षणाची पूर्ण मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. सहावीसाठी हा प्रवेश दिला जातो. त्यासाठी इयत्ता पाचवीचे विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. यावर्षी पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ११ हजार २६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले होते. पुणे शहरातूनही यावर्षी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ११ हजार २६९ पैकी १० हजार ५१७ विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण ९३.३३ टक्के होते. ३३ केंद्रांवर ही परीक्षा शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडली. जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी विविध केंद्रात जाऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली. त्यांच्या समवेत उपशिक्षणाधिकारी नीलेश धानापुने, पुणे मनपाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, समन्वयक हनुमंत बर्डे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

