‘इन्स्पायर ॲवॉर्ड’मध्ये २३ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड

‘इन्स्पायर ॲवॉर्ड’मध्ये २३ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड
Published on

पौड, ता. १६ : केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या ‘इन्स्पायर ॲवॉर्ड’मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या १७ शाखांतील २३ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे.
विद्यार्थी विज्ञान विषयाकडे आकर्षिला जावा, त्यांच्यातील सर्जनशील विचारांना चालना मिळावी या उद्देशाने केंद्रसरकारच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड हा सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम सुरू केला. यात जिल्ह्यातून निवड झालेल्या प्रत्येक प्रकल्पाला दहा हजार रुपयांचे अनुदान केंद्रसरकार देते. तर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पाची निवड झाल्यास त्यास इतर बक्षिसेही मिळतात. या उपक्रमात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रकल्प निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे :
आर्यन सोनवणे (न्हावी, भोर), श्रद्धा अवचर, कौशल साबळे, लक्ष शेळके, अंश शिंदे (सर्व इंग्रजी माध्यम शाळा खराडी, हवेली), ज्ञानेश्वरी पवार (डोणजे, हवेली), गौरव बाविस्कर (केसनंद, हवेली), ऋतुजा सूर्यवंशी (देहूरोड, हवेली), मानसी इंगळे (आकुर्डी, हवेली), आकाश बेलोरे (आकुर्डी इंग्रजी माध्यम, हवेली), समीक्षा जोरी, आदिती गोसावी (दोघीही कोळवण, मुळशी), अथर्व राऊत (पिरंगुट, मुळशी), श्रीनाथ गव्हाणे (घोटवडे, मुळशी), हंसिका राजेशिर्के (शिंद, भोर), वरद बोऱ्हाडे, आयुष मांडे (दोघेही ओझर, जुन्नर), आयुष नलावडे (शिरोली बुद्रूक, जुन्नर), यशराज दौंडकर, श्रेया मोहिते (दोघेही शेलपिंपळगाव, खेड), श्रावणी शिंदे (कामशेत, मावळ), सुमीत कवितके, अनुष्का जाधव (दोघेही चांदखेड, मावळ).

गेल्यावर्षी १० शाखांतील १४ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड झाली होती. यावर्षीचे २३ आणि गेल्यावर्षीचे १४ या सर्व विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पासाठी अधिकचे मार्गदर्शन संस्थेच्यावतीने करणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी सांगितले. विज्ञान शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नामुळे, विद्यार्थ्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com