चतुर्थ वेतनश्रेणीसाठी कोतवालांचे उद्यापासून मुंबईत धरणे आंदोलन

चतुर्थ वेतनश्रेणीसाठी कोतवालांचे
उद्यापासून मुंबईत धरणे आंदोलन
Published on

पौड, ता. १८ : राज्यातील महसूल खात्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्यावतीने गुरुवारपासून (ता. २०) मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मुळशी तालुक्यातील कोतवाल सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हुलावळे, खजिनदार गणेश पवार यांनी सांगितले.
राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांची गेली चाळीस वर्षापासून प्रलंबित असणारी चतुर्थ श्रेणीची मागणी अजूनही शासनाने पूर्ण केलेली नाही. याउलट सन २०२६ पासून दहा टक्के मानधनवाढ लागू केल्याने राज्यातील महसूल सेवकांवर अन्याय झाला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पामध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी मंजूर व्हावी, यासाठी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी निवेदन दिले होते. १९ मार्चपर्यंत मान्य न झाल्यास नाइलाजाने दिनांक २० मार्चपासून राज्यातील सर्व महसूल सेवक (कोतवाल) आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत कामबंद आंदोलन व धरणे आंदोलनास बसणार आहे. या आंदोलनात मुळशी तालुक्यातील कोतवाल सहभागी होणार आहेत, असे संघटनेच्या उपाध्यक्षा सुजाता हाळंदे, सचिव गणेश आवटी, सहसचिव अमित भंडलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com