‘रुग्णालय व्यवस्थापकांसमवेत लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी’

‘रुग्णालय व्यवस्थापकांसमवेत
लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी’
Published on

पौड, ता. १३ : पुणे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटांवर निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी लोकप्रतिनिधींची धर्मादाय आयुक्त, तसेच या योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या व्यवस्थापकांसमवेत बैठक आयोजित करावी, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच, गेल्या १ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर धर्मादाय योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांनी वर्षभरात किती रुग्णांवर दहा टक्के मोफत आणि दहा टक्के सवलतीच्या दरात उपचार केले, याची माहिती या बैठकीमध्ये उपलब्ध करण्याची मागणी आमदार मांडेकर यांनी केली आहे. नेक रुग्णालयात मोफत उपचार व सवलतीच्या दरात उपचार अथवा धर्मादाय रुग्णालय मार्गदर्शनपर बोर्ड दर्शनी भागात लावण्यात आलेले नाहीत. अनेक रुग्णालयांत डिपॉझिट भरल्याशिवाय उपचार सुरू केले जात नाही. तसेच रुग्णालयांमध्ये फोन केल्यानंतर आयसीयू बेड उपलब्ध होत नाही. जे रुग्णालय कायद्यांतर्गत रुग्णांना मोफत उपचार करत नाहीत, अशा रुग्णालयांची तपासणी होणे गरजेचे असल्याचे मांडेकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com