मेंढपाळांचा कुटूंबकबिला मुळशीतून परतीचा प्रवास

मेंढपाळांचा कुटूंबकबिला मुळशीतून परतीचा प्रवास

Published on

पौड, ता.२४ : मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे कोकणात शेळ्या बकऱ्या घेऊन आलेल्या मेंढपाळ बांधवांनी आपल्या गावाकडे पूर्वेच्या दिशेला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पुणे -पौड राष्ट्रीय महामार्गावर मेंढपाळांचा तांडाच्या तांडा जाताना दिसत आहे. यावर्षी पावसाने मे महिन्यात दमदार हजेरी लावल्याने बकऱ्या मेंढ्यांना चरण्यासाठी गवत मिळाल्याने मेंढपाळ बांधवांचे समाधानाचे वातावरण होते.
बारामती, दौंड, इंदापूर, फलटण या भागातून शेकडो मेंढपाळ आपल्या शेळ्या बकऱ्या घेऊन दरवर्षी येतात. घोड्यावर कोंबड्यांसह संसाराचा लवाजामा टाकून ही मंडळी कुटूंबकबिल्यासह मुळशीच्या दिशेने ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच येत असतात. सोबत कुत्र्यांचाही फौजफाटा असतो. शेतकरीवर्गही आपल्या शेतात या मेंढपाळांना आवर्जून बसवीत असतात. त्याचा मोबदलाही धान्याच्या रूपाने मेंढपाळांना दिला जातो. ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान आलेली ही मंडळी मुळशी धरण भागाच्या दिशेने कोकणकडे जात असतात. रानावनात शेळ्या बकऱ्यांना चारणे हा त्यांचा दिवसभर उद्योग असतो.
पौड, घोटवडे फाटा, पिरंगुट, भूगाव आणि चांदणी चौकात वाहतूक कोंडीचाही सुखद अनुभव प्रवासी मंडळी घेतात. मेंढपाळांच्या ये जा करण्याच्या प्रवासात मेंढ्या बकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. त्यामुळे मेंढपाळांचा बकऱ्या मेंढ्या चारण्याबरोबर विक्रीचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असतो.

04135

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com