मुळशीतील ४७ ग्रामपंचायती महिलांच्या हाती

मुळशीतील ४७ ग्रामपंचायती महिलांच्या हाती

Published on

पौड, ता. ७ : मुळशी तालुक्यातील २०२५ ते सन २०३० या पंचवार्षिककरिता ग्रामपंचायतीतील सरपंचपदाची आरक्षण सोडत पौड येथील पंचायत समितीच्या सभागृहात जाहीर केली. या सोडतीवेळी कही खुशी, कही गम अशी परिस्थिती पाहायला मिळाली. सरपंचपद सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाल्याने इच्छुकांच्या आनंदाला पारावार उरला नाही, तर काही गावात इतर प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने सर्वसाधारण वर्गातील इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले. तथापि ९२ पैकी ४७ ग्रामपंचायतीच्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती मिळणार आहे.
या आरक्षण सोडतीवेळी तालुक्याचे प्रभारी तहसीलदार जयराज देशमुख, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, सहाय्यक महसूल अधिकारी मंगेश शिंगटे, तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, इच्छुक मंडळी उपस्थित होती. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी पौडच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जातीच्या महिलांच्या तीन जागांसाठी आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या पाच जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
तालुक्यात एकूण ९२ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ, अनुसूचित जमातीसाठी चार आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २५ ग्रामपंचायतीतील सरपंचपद आरक्षित करण्यात आले. तर ५४ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गातील गावकारभाऱ्यांसाठी खुल्या झाल्या.
सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय निश्चित केलेले आरक्षण पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती- जातेडे, माळेगाव, दासवे, डावजे
अनुसूचित जाती स्त्री- चांदिवली, संभवे, पिरंगुट, शेरे, कोंढूर.
अनुसूचित जमाती- कुंभेरी, धामणओहळ.
अनुसूचित जमाती स्त्री- चांदे, काशिग
नागरिकांचा मागास प्रवर्ग- आंबवणे, असदे, अकोले, जांबे, कोंढावळे, बोतरवाडी,आडमाळ, वांद्रे, बेलावडे, खुबवली, नांदे, भूगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- पिंपळोली, दारवली, निवे, आंदगाव, मुलखेड, टेमघर, नाणेगाव, चिखलगाव, दखणे, कासारअंबोली, बार्पे, भोडे, भोईणी.
सर्वसाधारण- कोळावडे, ताम्हिणी, भांबर्डे, वातुंडे, कासारसाई, लवार्डे, मुगाव, तव, साठेसाई, घोटावडे, वळणे, अंबडवेट, शेडाणी, वेगरे, मांदेडे, खांबोली, आंबेगाव, हाडशी, चिंचवड, कोळवण, नांदगाव, भुकूम, मोसे खुर्द, रावडे, पोमगाव.
सर्वसाधारण स्त्री- भादस, उरवडे, पाथरशेत, मारुंजी, भरे, चाले, भालगुडी, नेरे, रिहे, कातरखडक, लवळे, वांजळे, वाळेण, मुळशी खुर्द, पौड, हिंजवडी, खेचरे, वारक, कुळे, मुठा, माले, जवळ, खारावडे, मारणेवाडी, जामगाव, आंदेशे, वडगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com