उद्या पुणे ते बारामती सायकल स्पर्धा

उद्या पुणे ते बारामती सायकल स्पर्धा

Published on

पौड, ता. १७ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने पुणे ते बारामती पुणे ते बारामती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शनिवारी (ता. १९) होणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी दिली.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व सहकार्याने स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, एअर फोर्स, तमिळनाडू, गुजरात, मध्य रेल्वे, नवी दिल्ली व महाराष्ट्र येथील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित सुमारे ८०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. शनिवारवाडा ते हडपसर सायकल रॅली (न्यूट्रल झोन) सर्वांसाठी खुली असून त्यामध्ये साडेतीन हजार विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी होणार आहेत. स्पर्धा पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तर, सासवड ते बारामती एमटीबी सायकलची खुली, माळेगाव ते बारामती राष्ट्रीयस्तर, सासवड ते बारामती (पोलिस /राज्य शासन कर्मचारी) राज्यस्तर आणि माळेगाव ते बारामती (पोलिस /राज्य शासन कर्मचारी (महिला) राज्यस्तर अशा सहा गटात होणार आहे.
सर्व वयोगटामधील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. शनिवारवाडा येथे स्पर्धेच्या उद्‍घाटनासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर आदी उपस्थित राहणार आहे. बक्षिस वितरण बारामतीतील गदिमा सभागृहात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम.पवार, सहसचिव ए. एम. जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com