पुणे
अकोलेमध्ये नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद
पौड, ता. २० : अंबडवेट (ता. मुळशी) येथील सुदर्शन सीएसआर फाऊंडेशन आणि एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय यांच्यावतीने अकोले येथे नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात ग्रामस्थांनी आपल्या डोळ्याच्या आरोग्याची माहिती घेतली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शिबिर घेण्यात आले. नेत्ररोग तज्ञ डॉ. निखिल शामगिरे यांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. गरजूंना मोफत चष्मे वाटप केले. तर मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सुदर्शनच्या सीएसआर प्रमुख वैशाली मुळे, अकोल्याच्या सरपंच कल्पना जाधव, उपसरपंच सतीश मराठे, सदस्या पद्मा सातपुते, योगेश मराठे, बाळासाहेब जाधव, ग्रामविकास अधिकारी इंद्रजित यादव, बचत गट अध्यक्षा देविका सातपुते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

