मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
पौड, ता. ५ : दखणे (ता. मुळशी) येथे मतदारांना पैसे वाटपावरून शिवसेनेने दोघांना पकडून निवडणूक आयोगाच्या ताब्यात दिले. निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख सुनील मदने (एफ.एस.टी पथक प्रमुख) यांनी याबाबत पौड पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून आबासाहेब दत्तू मरवडी व संदेश मारुती शिर्के यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई बुधवारी (ता. ४) मध्यरात्री करण्यात आली. मरवडी आणि शिर्के यांच्याकडून राष्ट्रवादी उमेदवाराच्या मतदार स्लिप, मतदारांची नावे असलेली वही, दोन मोबाईल फोन व सुमारे १,०१,२८० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर शेख पुढील तपास करीत आहेत. तथापि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पौडला या घटनेचा निषेध करीत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.
दरम्यान, मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष किंवा प्रलोभन दाखविणे किंवा नागरिकांनी आचारसंहितेचा भंग होताना दिसल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

