शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुळशीमध्ये १८ केंद्र
पौड, ता. २२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेतलेल्या जात असलेल्या शिष्यवृत्तीसाठी मुळशी तालुक्यातील पूर्व उच्च प्राथमिकमधील (इयत्ता पाचवी) २९८२; तर पूर्व माध्यमिकसाठी (इयत्ता आठवी) १५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पाचवीच्या बारा आणि आठवीच्या सहा केंद्रांमध्ये ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली.
मुळशी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील यांनी पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचे केंद्रनिहाय नियोजन केले. पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याकडे प्रत्येक केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या सोयीच्या ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाले होते. पूर्व उच्च प्राथमिकसाठी ९६ शाळांमधील २९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारा केंद्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. सुनील वाल्हेकर, सुरेश साबळे, किशोर वैरागर, अनिता दुधाळ, योगिता काळे, प्रदीप आखाडे, नियाझ काझी, सुनीता घाटे, विजय मारणे, सुनीता भगत, माधवी रोडगे, किसन गोरे यांच्याकडे केंद्राची जबाबदारी देण्यात आली होती.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी ६६ शाळांमधील १५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा सहा केंद्रांवर झाली. सचिन अवचिते, कविता ढोंरे, नियाज काझी, लता भोसले, संतोष गायकवाड, सुनील वाल्हेकर यांनी केंद्राची जबाबदारी सांभाळली.

