पौड येथे शनिवारी 
महाराजस्व शिबिर

पौड येथे शनिवारी महाराजस्व शिबिर

Published on

पौड, ता. ६ : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान शनिवारी (ता. ७ मार्च) पौड (ता. मुळशी) येथे राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पौड आणि सावरगाव मंडलमधील समाविष्ट गावातील रहिवाशांची महसूल विभागाची विविध कामे केली जाणार आहे. त्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी केली.
या अभियानासाठी प्रांत सुरेंद्र नवले उपस्थित राहणार आहेत. यावेळी ग्रामस्थांचे प्रलंबित फेरफार निकाली काढले जाणार आहे. सातबारामधील चुकांची दुरुस्ती होणार आहे. जिवंत सातबारा मोहीमे अंतर्गत सातबारा आणि आठ अ उताऱ्यांचे वाटप केले जाणार आहे. ४३च्या बंधनास पात्र जमिनीचा सत्ता प्रकार वर्ग दोनमधुन वर्ग एकमध्ये केले जाणार आहे. ग्रामस्थांना उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अकृषिक (बिनशेती) तरतुदींबाबत मार्गदर्शन आणि सुधारणा केल्या जाणार आहेत. नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. सामाजिक अर्थसाहाय्य योजनेबाबत जागृती केली जाणार आहे.
अधिवास, रहिवास दाखले. विविध जातीचे दाखले देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. सुधारित तुकडेबंदी तरतुदीबावत मार्गदर्शन व दस्तनोंदणी, अॅग्रीस्टॅक व पी. एम. किसान नोंदणी याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव अभिलेख अद्ययावत केली जाणार आहे, अशी विविध प्रकारची कामे या अभियानात मार्गी लावली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी योग्य कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहनही चोबे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com