

पुणे, ता. २९ : थकीत वीजदेयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पौड (ता. मुळशी) येथे मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पौड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५१ हजार रुपयांची थकबाकी न भरल्याने वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून घडला.
महावितरणच्या प्रधान तंत्रज्ञ रूपाली मुकेश शिर्के (वय ४३) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैष्णव किरण आगनेन, प्रीती किरण आगनेन, राज भोसले व एका अज्ञात तरुणावर गुन्हा नोंदवण्यात आला. शिर्के आणि त्यांचे सहकारी विठ्ठलवाडी-ओंबळेवाडी परिसरात वसुलीचे काम करत असताना ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांचे ५१ हजार रुपयांचे वीजदेयक थकल्यामुळे मुंबईतील स्वयंचलित प्रणालीद्वारे या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला होता. याचा जाब विचारण्यासाठी वैष्णव आगनेन याने कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी कार्यालयात घुसून कर्मचारी बालाजी घुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिर्के यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. पौड पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.