

पौड, ता. १५ : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, माध्यमिक शिक्षिका संघ, उच्च माध्यमिक शिक्षक संघ, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्ह्यातील ६२ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. रविवारी (ता. २० सप्टेंबर) वाजेवाडी- चौफुला (ता. शिरूर) येथील मयूरी लॉन्स मंगल कार्यालयात त्याचे वितरण होणार असल्याचे टीडीएफचे राज्याचे अध्यक्ष जी. के. थोरात, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष के. एस. ढोमसे यांनी सांगितले.
पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची तालुकानिहाय नावे पुढीलप्रमाणे- मुळशी- ज्ञानदेव कुंभार (मुख्याध्यापक, पिरंगुट), शुभांगी मोरे (पौड), मालन ववले (घोटावडे), मंगेश आव्हाड (आंदगाव). जुन्नर- भाऊसाहेब शिंदे (मुख्याध्यापक, पिंपरी पेंढार), प्रदीप सूर्यवंशी (ओतूर), मीनानाथ पानसरे (जुन्नर), सुनीता फापाळे (बोरी बुद्रुक), जगन्नाथ गाढवे (डिंगोरे). पुरंदर- हनुमंत पवार (मुख्य़ाध्यापक, माहूर), अतुल रोकडे (नायगाव), विद्या पवार (साकुर्डे), शहाजी पोमण (पिंपळे), अनिल दुर्गाडे (वाल्हे). शिरूर- एकनाथ चव्हाण (मुख्याध्यापक, वढू बुद्रुक), शरद रणदिवे (घोडनदी), संतोष मासळकर (शिक्रापूर), नंदा सातपुते (तळेगाव ढमढेरे), मनीषा दान (कोरेगाव भिमा). आंबेगाव- नवल पगार (मुख्याध्यापक, खडकवाडी), अशोक भवारी (फुलवडे), विजया लायगुडे (खडकी), दिलीप चौधरी (अवसरी खुर्द), सागर शिंदे (घोडेगाव). खेड- निवृत्ती गोपाळे (मुख्याध्यापक, भोसे), पांडुरंग नेवसे (पिंपरी बुद्रुक), चिंतामणी शिवेकर (वडगाव घेनंद), संदीप वालकोळी (आळंदी देवाची), शीला नाईकरे (राजगुरूनगर). दौंड- विलास थोरात (मुख्याध्यापक, वासुंदे), संतोष दोरगे (भांडगाव), सोमनाथ लवंगे (दौंड). रेश्मा थोरात (खुटबाव), ज्ञानेश्वर सोनवणे (कडेठाण). हवेली- राणी काळभोर (उरुळी कांचन), राजेश गोसावी (नायगाव), शरद जाधवर (फुलगाव), शिवाजी शिंदे (वाघोली). मावळ- नूतन कांबळे (मुख्याध्यापक, तळेगाव दाभाडे), महादेव शिंदे (उर्से), डॉ. संकेत पोंक्षे (तळेगाव दाभाडे), रोहिणी जंजिरे (वराळे), रेवजी आहिरराव (लोणावळा). राजगड- संजय अहिरे (मुख्याध्यापक, पानशेत), संजय बालगुडे (दापोडे), संजय तुपे (वांगणी), स्वाती पवार (आंबवणे). भोर- सुनील थोपटे (मुख्याध्यापक, आंबवडे), राजेंद्र सोनवणे (खानापूर), संतोष पवार (हातवे बुद्रुक), कविता वालझाडे (आंबाडे), विलास धेंडे (नसरापूर). इंदापूर- विकास पाठक (पळसदेव), दीपक झगडे (इंदापूर). महमूद मुलानी (बावडा), मनीषा जाधव (भिगवण), संभाजी भोईटे (सणसर). बारामती- स्वाती शिंदे (कारखेल), सतीश हेंद्रे (पणदरे), पंडित म्हस्के (काटेवाडी), डॉ. प्राजक्ता यादव (वाणेवाडी), संदीप शिंदे (कांबळेश्वर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.