राहू येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट

राहू येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Published on

राहू, ता. १८ : राहू (ता. दौंड) येथील मुख्य चौकात मटका, चक्री, ताडी, गावठी मद्य विक्री, इत्यादी अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून संबंधितांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राहूच्या मुख्य चौकात उघडपणे अवैध धंदे सुरू आहेत. येथील काही दुकानांमध्ये देशी, विदेशी अनेक प्रकारचे बनावट मद्य विकण्यासाठी ठेवले जातात. तसेच गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जाते. त्यामुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत.

नागरिकांमध्ये दहशत
वाघोली- राहू-पारगाव रस्त्यावरील ढाब्यांवर सर्रासपणे बेकायदेशीर दारू विक्री केली जाते. तसेच राहूच्या चौकात, शाळेच्या परिसरात भरदिवसा अनेक तरुण मद्य पिऊन नशेत वावरताना दिसतात.
दरम्यान, हे अवैद्य मद्य विक्री करून लाखो रुपये कमवत असून त्यांच्या भाईगिरी, गुंड प्रवृत्तीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीपोटी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास नागरिक सहजासहजी पुढे येत नसल्याची परिस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.