दौंड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप

दौंड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप

राहू, ता. ३१ : मराठी पत्रकार परिषद संचलित, पुणे जिल्हा पत्रकार संघ संलन्गित दौंड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप (महाराष्ट्र टाइम्स), शरद रणदिवे (उपाध्यक्ष), संतोष काळे (कार्याध्यक्षपदी), रामदास डोंबे (सचिवपदी) यांची बिनविरोध निवड केली.
कार्यकारिणी निवड पुढीलप्रमाणे : संदीप नवले (कोषाध्यक्ष), अमरसिंग परदेशी, त्रिभुज शेळके, जीवन शेंडकर, अक्षता हनमघर, मनोज खंडागळे यांची सदस्यपदी; तर, रमेश वत्रे (हल्ला विरोधी कृती समिती), राजू जगदाळे, संदीप चाफेकर (जिल्हा प्रतिनिधी) म्हणून यांची निवड केली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कामठे व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
या प्रसंगी परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, हितेंद्र गद्रे, प्रकाश शेलार, दीपक देशमुख, रवींद्र खोरकर, विशाल धुमाळ, संदीप सोनवणे, अतुल बोराटे, भाऊ ठाकूर, अमोल बनकर, नीलेश भुजबळ, सचिन आव्हाड, दादा चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान, मावळते अध्यक्ष रवींद्र खोरकर यांच्या तीन वर्षाच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन केले. प्रकाश शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संतोष जगताप यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com