राहूत दिव्यांगाना निधीचे वाटप

राहूत दिव्यांगाना निधीचे वाटप

Published on

राहू, ता.५ : राहू (ता.दौंड) येथे ४५ दिव्यांग बांधवांना नुकतेच सहायता निधीचे वाटप करण्यात आले. सरपंच दिलीप देशमुख, ग्रामसेवक प्रकाश जाधव यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.
राहू ग्रामपंचायतीकडून एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांगांना एक लाख दोन हजार पाचशे दहा रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. परिसरातील दिव्यांगांना शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना देखील दिल्या आहेत. जे कोणी लाभांपासून वंचित असेल त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन सरपंच दिलीप देशमुख, ग्रामसेवक प्रकाश जाधव यांनी केले.
यावेळी उपसरपंच गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सतीश नवले, रवींद्र कदम, ज्ञानेश्वर शिंदे,सुनंदा शिंदे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

02615

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com