राहू बेटपरिसरामध्ये कभी खुशी...कभी गम...
राहू, ता. २७ : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात आणि राहू बेट परिसरात पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. विहिरी, नाले, तुडुंब भरून वाहू लागले आहे. या अवकाळी पावसाचा फक्त तरकारी पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी... कभी गम.. असे वातावरण झाले आहे.
ऊस, डाळिंब इतर फळबागांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. मात्र, उन्हाळी तरकारी पिकांमधील मेथी, कोथिंबीर नदीकाठच्या बागायती पट्ट्यातील बोटावर मोजणाऱ्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला. शेतकरी राजा सुखावला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पावसाच्या उघडीपीनंतर आडसाली ऊस लागवडींना वेग येईल. तसेच बाजरी पेरणीलाही सुरुवात होण्याची दाट शक्यता असल्याचे दौंड कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
डोंगर, माळरानावर जनावरांसाठी चारा उगवण्यास सुरुवात झाली आहे. मेंढपाळांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. मेंढपाळ डोंगर पायथ्याशी राहू लागले आहेत.
विजेचा मात्र खेळखंडोबा
आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीज सारखी खंडित होत आहे. यामध्ये तारा तुटणे, डीपी वरील लिंक तुटणे. अचानक खांब कोसळणे अशा घटना घडत आहे . दरम्यान महावितरणचे अधिकारी देखील आपल्या कामांमध्ये तत्परता दाखवून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे.
03003
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.