दौंड तालुक्यात अनधिकृत प्लॉटिंगला ऊत

दौंड तालुक्यात अनधिकृत प्लॉटिंगला ऊत

Published on

राहू, ता. ३ : दौंड तालुक्यामध्ये अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली असून, ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. अनेक दलालांकडून ग्राहकांना चुना लावण्याचे काम सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अनधिकृत प्लॉटिंगकरिता दलाल धारकांकडून एनए न करता सातबारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतागुंती असून, तोंडी सांगत सर्रास अवैधपणे प्लॉटची विक्री करण्यात येत आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या थेट महसूल कार्यालयातून अशा दलालांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. भूमाफियांनी शेतजमिनींवर बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू केली आहे. ना पाणी, ना वीज, ना पक्क्या सिमेंट रस्त्यांची सोय तरीही नागरिकांना ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली आकर्षित फलकबाजी करत जाहिरातीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे.
दौंड, शिरूर, हवेली तालुक्यातील अनेक उप रस्त्यांवर अनधिकृत प्लॉट विक्री सुरू आहे. विशेषतः डाळिंब, उरुळी कांचन, कुरकुंभ, यवत, खोर, राहू, पाटेठाण, वाडे बोल्हाई, तसेच वाघोली- राहू- पारगाव रस्ता, यवत- राहू - वडगाव बांडे, टाकळी भीमा, खामगाव, नांदूर, सहजपूर दरम्यान रस्त्यांवर अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या दलालांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही जमिनीला आकर्षक रंगरंगोटी तयार करून ग्राहकांना फसवले जात आहे.

ग्राहकांची फसवणूक (चौकट)
अनेक ठिकाणी नोंदणीसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत, पण त्यानंतर ना बांधकाम परवानगी दिली जाते, ना विकास कामे सुरू होतात. काही प्रकल्प तर एनए म्हणजेच बंगल्यांसाठी योग्य असल्याचे भासवले जातात. मात्र, प्रत्यक्षात ती जमीन अजूनही शेती श्रेणीतच असते. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचे नापिक सांगतात. त्यामुळे भुमाफियांना उत्तेजन मिळत असून, त्यांचा धंदा बिनधास्त सुरू आहे. महसूल कार्यालयाच्या भोवताली हे दलाल सतत गिरट्या घालताना दिसतात.

जमीन घेण्यापूर्वी चौकशी गरजेची (चौकट)
गुंतवणूकदारांनी कोणतीही जमीन घेण्यापूर्वी ती जमीन एनए आहे की नाही, त्या जागेचा सातबारा उतारा, ले आउट मंजुरी, सर्च रिपोर्ट, बांधकाम विभागाची परवानगी याची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com