विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची मूल्ये रुजविण्याची गरज ः गुंजाळ
राहू, ता. ४ : ‘‘विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची मूल्ये रुजविणे काळाची गरज आहे. शिक्षण घेऊन देशसेवा करा. आई, वडील, गुरूंना दैवत माना. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. सुभाष कुल यांच्या विचारांची चळवळ आत्मसात करा. गुणात्मक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांना वाव द्यावा,’’ असे मत माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले.
राहू (ता. दौंड) स्वर्गीय सुभाष यांना कुल यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार रंजना कुल, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, शिवाजी सोनवणे, नीलकंठ शितोळे, कारखान्याचे संचालक विकास शेलार, अप्पासाहेब हंडाळ, तुकाराम ताकवणे, संजय इनामके, सुखदेव चोरमले, भीमा पाटस कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत पाटील, मयूर घुले, लक्ष्मण रांधवन, राजकुमार मोटे, नितीन म्हेत्रे, किसन शिंदे, चिमाजी कुल, विलास काळे, पृथ्वीराज जगताप, जयदीप सोडनवर, आदित्य कुल, मनीषा नवले, जयश्री जाधव, डॉ. गौरी कुल- जगदाळे, हेमलता जगताप, रोहिदास कंद आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. पायल टाकळकर या विद्यार्थिनीने राज्यगीत सादर केले. सूत्रसंचालन राहुल टेंगले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.