दहिटणे येथे घरगुती गॅसचा स्फोट

दहिटणे येथे घरगुती गॅसचा स्फोट

Published on

राहू, ता. २४ ः दहिटणे (ता.दौंड) येथे सोमवारी (ता. २४) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅसची टाकी अचानक लिकेज होऊन मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगल बबन चव्हाण या सोमवारी सकाळी गॅसवर स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता अचानक गॅसचा स्फोट झाला. गॅसच्या स्फोटामुळे घराच्या छतावरील पत्रा लांब जाऊन पडला. तसेच, भिंती देखील कोसळल्या असून, काही भिंतींना भेगा पडल्या आहेत.
मंगल चव्हाण घरामध्ये एकट्याच राहतात. चव्हाण यांचा प्रपंच अक्षरशः रस्त्यावर आला आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने चव्हाण परिवाराच्या संसाराला आम्ही फूल ना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे येथील माजी सरपंच बापूराव कोळपे, बाजार समितीचे उपसभापती शरद कोळपे यांनी सांगितले. दरम्यान, यवत पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, अधिक पोलिस करत आहे.

दैव बलवत्तर म्हणून मी वाचले
याबाबत मंगल चव्हाण यांनी सांगितले की, ‘‘स्वयंपाक करण्यासाठी मी गेले असता अचानक गॅसचा स्फोट झाला. गॅसची टाकी उंचावर जाऊन पडल्याने टाकीचे चार भाग झाले. घराच्या छतावरील पत्रे देखील काही अंतरावर फेकले गेले. दैव बलवत्तर म्हणून या प्रसंगातून मी वाचले. माझा मोडका- तोडका संसार उभा करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.’’

दौंडच्या पश्चिम पट्ट्यात गॅसचा काळाबाजार सर्रास चालतो. हॉटेल, ढाबा, घरगुती, काही परप्रांतीय ग्राहकांना ज्यादा पैशाने गॅसची विक्री केली जाते. दौंड तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा विभागाचा आर्थिक तडजोडी पोटी यावर कुठल्याही प्रकारचा वचप राहिलेला नाही. गॅस वितरकांकडून जीर्ण गॅसच्या टाक्या ग्राहकांना पुरवल्या जातात. जीर्ण झालेल्या टाक्यांची तपासणी करून घ्यावी. तत्काळ चौकशी करून अशा गॅस वितरकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (पुरवठा विभाग) त्वरित बंद कराव्यात.
- विठ्ठल थोरात, अध्यक्ष, जनहित रक्षक सेवाभावी संस्था.

03579

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com