

राहू, ता. २४ : राहू (ता. दौंड) येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शंभुराजे मित्र मंडळाच्या वतीने किल्ले अडसर येथून पायी शिवज्योत आणली. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत सहभाग नोंदवला. शिवव्याख्याते आकाश महाराज कामठे यांचे कीर्तन सेवा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर त्यांनी प्रकाश टाकत समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, पंचायत समिती सदस्य सुखदेव चोरमले यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शारदा विद्यालयात छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, शंभूराजे यांच्या, तर विद्यार्थी सरदार, शाहिर मावळ्यांच्या वेशभूषा परिधान करून प्रभातफेरी गावातून काढण्यात आली. पिंपळगाव येथे संभाजी ब्रिगेड व सुनील नाना पासलकर मित्रपरिवाराच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. दहिटणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राहूबेट आणि खामगाव परिसरातील अनेक गावांमध्ये रक्तदान, शिबिरे, वृक्षारोपण, शिव व्याख्याने आदी सामाजिक उपक्रमावर भर देऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
03706
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.