खामगावच्या विद्यार्थ्यांचे एनएमएमएसमध्ये यश
राहू, ता. २५ : खामगाव (ता. दौंड) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. इयत्ता आठवीतून एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष माणिकराव नागवडे, सचिव विकास जगताप, कार्याध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यशामागे परिश्रम घेणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माणिकराव नागवडे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

